वृद्धेला १४ दिवसांचा 'डिजिटल अरेस्ट'

Foto
३ कोटींचा गंडा; ३२ लाख पोलिसांनी गोठवले
छत्रपती संभाजीनगर, न (सांजवार्ता ब्युरो) : 'तुमच्या नावाने मुंबईत बँक खाते उघडण्यात आले असून, त्यातून न दहशतवादी कारवायांसाठी पैसे पाठवले जात आहेत,' 5 अशी भीती दाखवत सायबर भामट्यांनी ७५ वर्षीय महिलेला १४ दिवस डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले. पोलिसांच्या गणवेशातील व्यक्तीचा व्हिडिओ कॉल, अटकेची धमकी आणि सततच्या र चौकशीच्या नावाखाली दबाव टाकत भामट्यांनी त्यांच्या पाच बँक खात्यांतून ३ कोटी ८० हजार रुपये आरटीजीएसद्वारे 5 वळते करून घेतले. १८ न सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान 5 हा प्रकार घडला. फसवणूक र लक्षात आल्यानंतर महिलेने जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार
5
11:45pm
दिली असून, पोलिसांना रात्री उशिरापर्यंत ३२ लाख रुपये गोठवण्यात यश आले.
व्यंकटेशनगर येथील शुभदा अशोक कुलकर्णी (७५) यांना १८ सप्टेंबर रोजी दुपारी फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख नाशिक गुन्हे शाखेतील अधिकारी राजन भिसे अशी करून दिली. त्यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून मुंबईतील
कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले असून, त्यातून दहशतवादी कारवायांसाठी पैसे पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने फोन करून संबंधित खात्यात दोन कोटी रुपये जमा झाल्याचे सांगितले. त्यातील दोन लाख रुपये कमिशन म्हणून कुलकर्णी यांच्या खात्यात पाठवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
एफडीचीही घेतली माहिती
१८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वारंवार फोन करून रिझर्व्ह बँकेची चौकशी सुरू असल्याचे सांगत त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. कोणालाही माहिती दिल्यास कुटुंबाला धोका असल्याची धमकीही देण्यात आली. भामट्यांनी त्यांच्या सर्व बँक खात्यांची, व्यवहारांची तसेच मुदत ठेवींची माहिती घेतली. त्यानंतर वेगवेगळ्या खात्यांतून त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यांवर आरटीजीएसद्वारे रक्कम पाठवण्यास भाग पाडले. खात्यातील मोठी रक्कम गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुलकर्णी यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions